केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासंबंधी देखिल मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, आरोग्य क्षेत्रात अनेक सुधारणांची गरज आहे. त्यामुळे नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे. यासोबतच वैद्यकीय महाविद्यालयात अधिकाधिक लॅबची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासोबतच आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी नवीन मशीन आणल्या जातील जेणेकरून भारतात सर्वात मोठ्या आजारावर यशस्वी उपचार करता येतील.
सन 2023 च्या अर्थसंकल्पात 2027 पर्यंत अॅनिमिया हा आजार मुळापासून समूळ नष्ट करणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.कारण दरवर्षी रक्ताअभावी अनेकांचा मृत्यू होतो. यासोबतच 2047 पर्यंत ते संपवणार असल्याची देखिल घोषण करण्यात आली आहे. स्वच्छ पाणी आणि अन्न खूप महत्वाचे आहे हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात याला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.
मोदी सरकारने मॅनहोल्सबाबत मोठा निर्णय घेतला आहे.अर्थसंकल्पीय वर्ष 2023 मध्ये मॅनहोल्समध्ये आता कामगार उतरणार नाहीतर मशीनद्वारे काम करण्यात येणार आहे.