ताज्या बातम्या

पुढील 1 वर्षासाठी लोकांना पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा लाभ मिळणार - निर्मला सीतारामण

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करत आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान, निर्मला सीतारामन यांनी गरिबांना मोठा दिलासा दिला आणि सांगितले की पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) एक वर्षासाठी वाढवली जात आहे. म्हणजेच पुढील 1 वर्षासाठी लोक मोफत रेशन घेऊ शकतील.

कोरोना महामारीच्या काळात भारतातील प्रत्येक घरात कोणीही उपाशी झोपू नये हे लक्षात घेऊन मोदी सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) सुरू केली. यामध्ये गरीब किंवा गरजूंना 5 किलो मोफत धान्य देण्याची तरतूद आहे. केंद्र सरकारच्या पीएम गरीब कल्याण योजनेंतर्गत 80 कोटी गरीब लोकांना मोफत रेशनचा लाभ दिला जात आहे. सप्टेंबर 2022 मध्ये ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु नंतर सरकारने ती आणखी वाढवली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, देशाच्या स्वातंत्र्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पात आमच्या सरकारने प्रत्येक वर्गापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. तरुणांना आणि सर्व वर्गातील लोकांना आर्थिक बळ देण्याचा आमचा प्रयत्न आहे. जगात मंदी असतानाही भारताचा सध्याचा विकास दर ७ टक्क्यांच्या आसपास आहे. आव्हानांनी भरलेल्या काळात भारत विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. जगभरातील लोकांनी भारताच्या विकासाचे कौतुक केले आहे. हा अर्थसंकल्प पुढील 25 वर्षांची ब्लू प्रिंट आहे. कोरोना साथीच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेने देशाला एका नव्या उंचीवर नेले आहे आणि जगाने भारताची ताकद ओळखली आहे. असे ते म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा