आज संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सकाळी 11 वाजता हा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत, यादरम्यान या अर्थसंकल्पात कोणत्या गोष्टी स्वस्त आणि कोणत्या गोष्टी महाग होणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.
याचपार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पुढची 5 वर्षे विकासाची संधी देणार असं म्हटलं आहे, तसेच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात अर्थव्यस्थेला गती देण्याचं उद्दिष्ट ठेवत, मेक इन इंडियावर भर देण्याचा प्रयत्न करणार असं निर्मला सीतारामण म्हणाले आहेत. या बजेटमध्ये गरीब, युवक आणि महिलांकडे लक्ष दिले जाणार आहे.
विज्ञान क्षेत्रासाठी काय?
वैद्यकीय महाविद्यालयात पुढील वर्षात १० हजार जागा वाढवणार
वैज्ञानिक संशोधनाला चालना देण्यासाठी ५ वर्षांचा कार्यक्रम
आयआयटींची क्षमता वाढवली, ६५०० जागा वाढवणार
२०४७ पर्यंत १०० गीगावॅट आण्विक ऊर्जेचं लक्ष्य
तंत्रज्ञानातील संशोधनासाठी आयआयटीद्वारे फेलोशिप
पुढील ५ वर्षात १० हजार फेलिशीप
महिलांसाठी 'या' खास योजना
एससी आणि एसटी महिलांसाठी विशेष योजना
१.५ लाख कोटींचा पायाभूत सुविधांसाठी राज्यांना निधी
महिलांना 2 कोटी रुपयांचा मध्यम मुदतीचे कर्ज नव्याने लघुउद्योजक देण्यात येणार
महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणार
चामड्यांची पादत्राणे बनवणाऱ्यांसाठी योजना, 5 लाख महिलांना योजनेचा घेता लाभ येणार
महिलांना 2 कोटींची स्टार्टअपसाठी मदत
इंडिया पोस्ट महिला बँकेचे नूतनीकरण करणार
स्टार्टअप्ससाठी 10 हजार कोटींची तरतूद
देशभरातील एक कोटी गर्भवती, स्तनदा मातांना तसेच किशोरवयीन मुलींना 1 लाख पोषणमूल्य वाढवणार, ईशान्य भारतातही विशेष लक्ष