ताज्या बातम्या

इमारत कोसळून 4 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

इमारत कोसळल्याची घटना घडली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

दिल्लीमध्ये इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. दिल्लीच्या मुस्तफाबाद परिसरात पहाटे एक इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली असून या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ टीम आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून त्यांच्याकडून बचाव आणि मदतकार्य राबवण्यात येत आहे.

पहाटे 2 वाजून 50 मिनिटांनी ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत 8 ते 10 जणांना वाचवण्यात आले असल्याची माहिती विभागीय अग्निशमन अधिकारी राजेंद्र अटवाल यांनी दिली आहे. इमारत कशी कोसळली, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंनी बेस्ट पतपेढी पराभवासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू