narendra modi Team Lokshahi
ताज्या बातम्या

मान झुकेल असं कोणतंही काम आम्ही केलं नाही - PM मोदी

गुजरातच्या राजकोटमध्ये पंतप्रधान मोदींनी आज सभेला संबोधित केलं.

Published by : Sudhir Kakde

राजकोट : पंतप्रधान मोदी आज गुजरात (Gujrat) दौऱ्यावर आहेत. यावेळी जनतेला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले की, जेव्हा लोकांच्या प्रयत्नांची सरकारच्या प्रयत्नांना साथ मिळते, तेव्हा आपली सेवा करण्याची शक्ती वाढते. राजकोटमधील KDP मल्टिस्पेशालिटी हे आधुनिक रुग्णालय याचंच प्रमुख उदाहरण आहे. पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) आपल्या भाषणात सांगितलं की, 26 मे रोजी एनडीए सरकारला 8 वर्षे पूर्ण झाली आहेत.

पंतप्रधान म्हणाले की, या काळात त्यांच्या सरकारने असं कोणतंही काम केलं नाही, ज्यामुळे जनतेला नाक खाली घालावं लागलं. 6 कोटी कुटुंबांना पाणीपुरवठा करण्यात आला आहे, ३ कोटींहून अधिक गरिबांना घरं देण्यात आली. अडचणीच्या काळात थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले. जेव्हा कोरोनाच्या काळात उपचारांची गरज वाढली तेव्हा आम्ही चाचण्याही वाढवल्या. जेव्हा लसीची गरज भासली तेव्हा ती मोफत दिली गेली, गरिबांचा नेहमीच सन्मान राखला गेला असं मोदी म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा