प्रशांत जगताप, सातारा
म्हसवडमध्ये आमदार जयकुमार गोरे यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पुतळ्याचे दहन केले होते. त्याचे पडसाद फलटण शहरमध्ये उमटले. फलटण शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून आपला राग व्यक्त केला आहे.
रामराजेंच्या समोर आमदार जायकुमार गोरे यांची पात्रता नाही. त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विनाकारण रामराजे यांच्याविरोधात चुकीचे वर्तन केल्यास जश्यास तसे उत्तर दिले जाईल असे सांगत म्हसवड येथील पुतळा दहनच्या घटनेला जशास तसे उत्तर देत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमदार गोरेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केलीये.