ताज्या बातम्या

Best Bus: बसच्या तिकीट दरात होणार वाढ? बेस्टवर 6 हजार कोटींच कर्ज

मुंबईत बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट द्वारे बससेवा चालवली जाते. मात्र आता बेस्टला आर्थिक संकटाचा सामना कराला लागत आहे.

Published by : Dhanshree Shintre

मुंबईत बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट द्वारे बससेवा चालवली जाते. मात्र आता बेस्टला आर्थिक संकटाचा सामना कराला लागत आहे. बेस्टवर सध्या सुमारे 6 हजार कोटी रुपयांचे कर्ज असून, त्यातून बाहेर पडणे कठीण आहे. त्यामुळे बेस्टने BMC कडे 1400 कोटी रुपयांची आर्थिक मदत मागितली आहे. काही दिवसांपूर्वी याबाबत BMC आणि बेस्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये बैठकही झाली होती. त्यात कोणताही निर्णय झाला नव्हता.

मनपानं 2024-25 च्या अर्थसंकल्पात बेस्ट उपक्रमासाठी 800 कोटींच्या निधीची तरतूद केली होती. याच मदतीच्या जोरावर बेस्ट उपक्रमाला गाड्यांचे पार्ट्स खरेदी करणं, पायाभूत सुविधा मजबूत करणं, कर्ज चुकवणं आणि पगार देणं शक्य झालं. दरवेळी मनपाकडे मदतीची याचना करण्याऐवजी इतर पर्यायांचा वापर करुन निधी जमा करण्याचा सल्ला बेस्ट उपक्रमाला देण्यात ला आहे. मुंबई मनपानं याआधीही बेस्ट उपक्रमाला मदत केली असल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितलं. पण आता बेस्ट उपक्रमानं इतर पर्यायांचाही विचार करायला हवा असं मनपाचं म्हणणं आहे. आता तिकीट दरात वाढ करणं हाच एक पर्याय शिल्लक राहिला आहे आणि भाडेवाढीचा विचार केला जावा असं मनपाचंही म्हणणं असल्याचं अधिकाऱ्यानं सांगितलं.

दैनंदिन, साप्ताहिक आणि मासिक पासच्या दरात थोडी वाढ झाली होती. मासिक एकेरी पाससाठी आधी 299 रुपये आकारले जात होते, ते आता 600 रुपये झाले आहे. अमर्यादित पासची किंमतही 750 रुपयांवरून 900 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. आता लवकरच तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता आहे. बेस्टच्या मालकीच्या बसेसची संख्या घटली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात चिमुकलीने जिंकली मनं ! राज ठाकरेंना म्हणाली 'I love You तर...

Raj & Uddhav Thackeray Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?

Sushil Kedia Apologizes : मराठीबद्दल वादग्रस्त विधानानंतर अखेर सुशील केडियाने मागितली माफी