Pune Mumbai St Bus Service 
ताज्या बातम्या

Pune Mumbai St Bus Service : पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या बसेस अचानक थांबल्या! ट्रॅफिक जॅममुळे प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ…

पुण्यातून मुंबईकडे जाणाऱ्यांसाठी अडचणीची बातमी आहे. मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ गॅसने भरलेला टँकर पलटी झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

Published by : Riddhi Vanne

Pune Mumbai St Bus Service : पुण्यातून मुंबईकडे जाणाऱ्यांसाठी अडचणीची बातमी आहे. मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ गॅसने भरलेला टँकर पलटी झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या घटनेमुळे राज्य परिवहन महामंडळाने पुणे–मुंबई दरम्यानच्या अनेक बसेस रद्द केल्या आहेत.

महामार्गावर गेल्या अनेक तासांपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून काही ठिकाणी वाहतूक जवळपास ठप्प आहे. अनेक खासगी वाहने आणि एसटी बसेस अडकून पडल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

अपघातग्रस्त टँकरमधून गॅस गळती सुरू असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. गॅस दुसऱ्या टँकरमध्ये हलवण्याचे काम सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतरच मार्ग मोकळा होणार आहे. तोपर्यंत वाहनचालकांनी पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग टाळावा आणि शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

थोडक्यात

  • पुण्यातून मुंबईकडे जाणाऱ्यांसाठी अडचणीची बातमी आहे.

  • मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ गॅसने भरलेला टँकर पलटी झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

  • या घटनेमुळे राज्य परिवहन महामंडळाने पुणे–मुंबई दरम्यानच्या अनेक बसेस रद्द केल्या आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा