'वन नेशन वन इलेक्शन' विधेयक कॅबिनेटमध्ये मंजूर झाल्याची सूत्रांची माहिती आहे. मोदी सरकारचा मोठा अजेंडा कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काही दिवसांपूर्वीच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्त्वाखालील समितीने 'वन नेशन, वन इलेक्शन' संदर्भातील अहवाल तयार केला होता. या अहवालात 'एक देश, एक निवडणूक' विधेयकाच्या बाजूने शिफारस करण्यात आली होती.