ताज्या बातम्या

पुणे शहरातील खराडी येथे आढळली गांजाची झाडे

पुणे शहरातील खराडी येथील पीएमसीच्या ग्राउंड मध्ये गांजाची झाडे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Published by : Team Lokshahi

पुणे |चंद्रशेखर भांगे | पुणे शहरातील खराडी येथील पीएमसीच्या ग्राउंडमध्ये गांजाची झाडे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांत पुण्यात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ आढळत येत असतानाच खराडीमध्ये तर पीएमसीच्या ग्राउंडमध्येच चक्क गांजाची झाडे आढळून आल्याने चर्चांना उधाण आले आहे.

महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम राबवताना सामाजिक कार्यकर्त्यांना गांजाची झाडे आढळून आली. येथे गांजाची झाडे आढळून आल्याने माजी आमदार बापूसाहेब पठारे व सामाजिक कार्यकर्त्या प्रभा करपे व नागरिकांनी नाराजी व्यक्त करत महानगरपालिकेने या खेळाच्या ग्राउंडकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे. आता या घटनेकडे पुणे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन कशाप्रकारे पाहते हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा