ICAI CA Result 2025 : सीए अंतिम परीक्षेचा निकाल घोषित, महाराष्ट्राचा मुलगा राजन काबरा देशात पहिल्या स्थानी ICAI CA Result 2025 : सीए अंतिम परीक्षेचा निकाल घोषित, महाराष्ट्राचा मुलगा राजन काबरा देशात पहिल्या स्थानी
ताज्या बातम्या

ICAI CA Result 2025 : सीए अंतिम परीक्षेचा निकाल घोषित, महाराष्ट्राचा मुलगा राजन काबरा देशात पहिल्या स्थानी

सीए अंतिम निकाल 2025: राजन काबरा देशात पहिला, महाराष्ट्राच्या यशाची नवी गाथा.

Published by : Team Lokshahi

Maharashtra's Rajan Kabra Tops The Country After CA Final Exam Results Declared : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI)ची परीक्षा मे 2025 च्या CA Final निकाल रविवारी जाहीर झाला. यामध्ये महाराष्ट्राने देशपातळीवर यशाची नवी गोष्ट लिहिली केली आहे. छत्रपती संभाजीनगरचा राजन मनोज काबरा हा देशातून पहिला पटकावला आहे. राजनने 600 पैंकी 516 गुण मिळवत संपूर्ण देशात अव्वल स्थान मिळवले आहे. राजनने याआधी फाउंडेशन 2021 आणि इंटरमिडिएट (2022 ) परीक्षांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला होता. आपल्या सातत्यपूर्ण आणि सखोल अभ्यासाच्या जोरावर त्याने तिन्ही स्तरांवर अव्वल कामगिरी कायम राखली आहे.

विजयानंतर राजन म्हणतो की, “मी देशात पहिला येईन असा विचार केला नव्हता. पण दररोजच्या अभ्यासात सातत्य ठेवले, विषय समजून घेतला आणि स्वतःवर विश्वास ठेवला. त्यामुळेच हे यश मिळवू शकलो. सीए परीक्षा कठीण असली तरी ताण न घेता, नियमितपणे अभ्यास केल्यास कोणतीही परीक्षा सहज शक्य होते.”

छत्रपती संभाजीनगरचा घवघवीत निकाल

या परीक्षेला छत्रपती संभाजीनगर शहरातून एकूण 580 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 174 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

गट-1मध्ये 218 पैकी 40 , गट-2 मध्ये 107 पैकी 20 आणि दोन्ही गटांमध्ये 256 पैकी 57 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

तसेच इंटरमिडिएट परीक्षेत 736 पैकी 195 आणि फाउंडेशन परीक्षेत 836 पैकी 222 विद्यार्थी उत्तीर्ण ठरले.

अभिनंदनाचा वर्षाव

ICAI छत्रपती संभाजीनगर शाखेचे अध्यक्ष महेश इंदाणी, उपाध्यक्ष अमोल गोधा, सचिव आनंद तोतला, कोषाध्यक्ष रफिक पठाण, विकासाध्यक्ष समीर शिंदे, केदार पांडे आणि ऐश्वर्या भामहेचा यांनी राजन आणि इतर यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यावर्षी संभाजीनगरमधून 80 हून अधिक विद्यार्थी सनदी लेखापाल (CA) म्हणून पात्र ठरले आहेत.

हेही वाचा...

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा