देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गुरुवारी अचानक त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉ. मनमोहन सिंह भारताचे 14 वे पंतप्रधान होते.
अर्थ मंत्रालयाचे सचिवपद, रिझर्व बँकेचे गव्हर्नरपद, पंतप्रधानांचे प्रमुख आर्थिक सल्लागार, नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षपद अशी अनेक पदे डॉ. मनमोहन सिंह यांनी भूषवली.
पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी झाला. पंजाब विद्यापीठातून त्यांनी उच्च शालेय शिक्षण पूर्ण केले. केम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात प्रथम श्रेणीमध्ये पदवी प्राप्त केली त्यानंतर 1962 साली डॉ. सिंह यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या नफिल्ड महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात डी फील संपादन केली. मनमोहन सिंह यांनी दोन वेळा भारताचे पंतप्रधान पद भूषवले.
वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर 1972 साली डॉ. मनमोहन सिंह यांची अर्थमंत्रालयात प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती झाली. मनमोहन सिंह यांना अनेक पुरस्कार मिळाले. यामध्ये केम्ब्रिज विद्यापीठाचा अॅडम स्मिथ पुरस्कार, जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी सन्मान, सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण, आशिया मनी अवार्ड.यासोबतच ऑक्सफोर्ड आणि केम्ब्रिजसारख्या अनेक विद्यापीठांकडून डॉ मनमोहन सिंह यांना मानद पदवी प्रदान करण्यात आली.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे 1982 ते 1985 या काळात ते गव्हर्नर होते. तसेच 1991 मध्ये ते केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री होते.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची कारकीर्द
डॉ. मनमोहन सिंह यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी झाला.
पंजाब विद्यापीठातून त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं.
1962 साली डॉ. सिंह यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या नफिल्ड महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात डी फील संपादन केली
मनमोहन सिंह यांनी 1966 ते 1969 या काळात संयुक्त राष्ट्रात काम केलं.
वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली
भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार1972 ते 1976 या काळात त्यांनी काम केलं.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे 1982 ते 1985 या काळात ते गव्हर्नर होते.
1985 ते 1987 या काळात ते नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते.
डॉ. मनमोहन सिंह यांची 1991व्या साली अर्थमंत्रीपदी निवड करण्यात आली.
त्यानंतर डॉ. मनमोहन सिंह हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते.
2004 साली डॉ. मनमोहन सिंह यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
डॉ. मनमोहन सिंह यांनी दोन वेळा पंतप्रधान म्हणून काम केलं.
त्यानंतर डॉ. मनमोहन सिंह यांनी एप्रिल 2024 मध्ये राज्यसभेतून निवृत्ती घेतली.