ताज्या बातम्या

लग्नाचे आमिष दाखवून केला सातत्याने अत्याचार; रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्षविरोधात गुन्हा दाखल

अकोल्यातील रिपब्लिकन ऑफ पार्टीचे जिल्हा अध्यक्ष गजानन कांबळे यांच्यावर रामदास पेठ पोलिस स्टेशन येथे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने अकोल्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

Published by : Team Lokshahi

अमोल नांदूरकर | अकोला : अकोल्यातील रिपब्लिकन ऑफ पार्टीचे (Republican Party) जिल्हा अध्यक्ष गजानन कांबळे यांच्यावर रामदास पेठ पोलिस स्टेशन येथे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने अकोल्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. तक्रार दाखल होताच आरोपी गजानन कांबळे फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

अकोला येथील एका पीडित महिलेने रामदास पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अकोला फिर्याद दाखल करून आपल्याला गेल्या 4 ते 5 वर्षेपासूनच लग्नाचे आमिष दाखवून अकोल्यातील रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष गजानन कांबळे यांनी विविध पर्यटनस्थळी फिरविले व आपल्या मर्जी विरुद्ध आपल्यावर अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली. आपण आरोपीस लग्नाबद्दल विचारणा केली असता सदर आरोपी गजानन कांबळे याने उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळाटाळ करीत असल्याचे देखील तक्रारीत म्हंटले आहे.

मागील काही दिवसांपूर्वी एका हॉटेलमध्ये एक खोली घेऊन सतत 4 दिवस पीडितेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले आसल्याचे तक्रारीत नमूद केले असून याबाबत रामदास पेठ पोलीस ठाण्यात फिर्यादी महिलेने फिर्याद दिल्यावरून पोलिसांनी आरोपी गजानन कांबळे विरोधात बलात्काराच्या गुन्ह्यासह इतर गुन्हे दाखल केले आहेत सदर प्रकरणा नंतर आरोपी गजानन कांबळे हा फरार झालं असून रामदास पेठ पोलिस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?