melghat  Team Lokshahi
ताज्या बातम्या

अखेर मेळघाटातील आदिवासी युवतीच्या मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल

दोन दिवसांपूर्वी लव जिहादचा प्रकार असल्याचा अनिल बोंडे यांनी केला होता आरोप

Published by : Sagar Pradhan

सूरज दहाट | अमरावती :अमरावती जिल्ह्यात सध्या आंतरधर्मीय विवाहाचे प्रकरण चांगलच तापल आहे, भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी आंतरधर्मीय विवाहा बाबत अनेक धक्कादायक खुलासे व आरोप केलेत, दोन दिवसांपूर्वी अनिल बोंडे यांनी मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील कोटमी गावात एका आदिवासी युवतीची लव जिहाद वरून हत्या झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. अखेर 22 दिवसानंतर चिखलदरा पोलिसांनी या प्रकरणात खुनाचा गुन्हा व अनुसूचित जाती जमाती कलम अंतर्गत गुन्हे दाखल केले असून तिघांना या प्रकरणी अटक केली आहे यात आरोपी मध्ये दोन तरुण आदिवासी असून एका मुस्लिम तरुणांचा समावेश आहे.

कोटमी गावातील 19 वर्षीय तरुणीला घरातून पळवुन नेत पुणे येथे नेण्यात आला होत असा आरोप अनिल बोडे यांनी केला होता,नंतर तिचा 19 ऑगस्ट रोजी गावातीलच शेतात मृतदेह आढळला होता, तरी देखील पोलिसांनी यात खुनाचा गुन्हा दाखल केला नव्हता. मुलीच्या वडिलांनी चिखलदरा पोलिसांना सर्व पुरावे देऊनही पोलिसांनी यात हलगर्जीपणा केला होता, व पोलीस आरोपीला सहकार्य करत असल्याचा आरोपही अनिल बोडे यांनी केला होता.

त्यामुळे बोंडे यांच्या आरोपानंतर आज चिखलदरा पोलिसांनी या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे, मुलीचा गळा दाबून तिचा मृतदेह पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने विहिरीत टाकण्यात आला होता त्यामुळे पोलिसांनी जाकिर अहमद उर्फ जाकू अहमद निसार राहणार परतवाडा वय २४वर्ष या मुस्लिम तरुणासह कोटमी येथील अमोल उईके, मुकेश बेठेकर या तीन तरुणांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे. मृतक युवती आदिवासी असल्याने व यातील एक आरोपी मुस्लिम असल्याने एका मुस्लिम आरोपी विरुद्ध अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा