ताज्या बातम्या

Kalyan-Dombivli : मुख्यमंत्र्यांना अपशब्द वापरल्या प्रकरणी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांना डोंबिवलीतील शिवसेनेच्या महिला पदाधिकारी कविता गावंड यांनी अपशब्द वापरल्या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Published by : Team Lokshahi

अमझद खान | कल्याण : सध्या राज्यभरात शिंदे गट विरुद्ध शिवसेना अशा संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यातच उद्धव ठाकरे गट व शिंदे गट अशा दोन्ही बाजूने कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना आवाहन करण्याचे आणि भावनिक साद घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कल्याण-डोंबिवलीत देखील या वादाचे पडसाद उमटले आहेत. याचदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांना डोंबिवलीतील शिवसेनेच्या महिला पदाधिकारी कविता गावंड यांनी अपशब्द वापरल्या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून शिंदे गटाकडून ही तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

डोंबिवलीत शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत मंगळवारी दुपारी ठाकरे गट व शिंदे गटात जोरदार राडा झाला. शाखेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा फोटो काढण्यात आला होता. काल दुपारच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटो पुन्हा लावण्यासाठी शिंदे गटातील कार्यकर्ते शाखेत गेले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फोटो लावण्यात आला. फोटो लावताना दोन्ही गटात जोरदार राडा झाला .दोन्ही गटातील कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी केली यावेळी एकमेकांना धक्काबुक्की देखील करण्यात आली होती .पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत परिस्थीत नियंत्रणात आणली यामुळे शाखेला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.शिंदे गटातील योगेश जुईकर यांच्या तक्रारीनंतर राम नगर पोलीसानी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी कविता गावंड यांच्या विरोधात भा द वी १५३ अ आणि ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा