उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने एक गाणं म्हटले. हे गाणं सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल असून कुणाला कामरा आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
कुणाल कामराने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्याने गाणं म्हटले आहे. एकनाथ शिंदेंविरोधात त्याने केलेल्या एका गाण्यावरुन वाद निर्माण झाला असून कुणाल कामराच्याविरोधात आता शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे.
आमदार मुरजी पटेल यांनी अंधेरीतील एमआयडीसी पोलिस ठाण्यात कामराविरोधात तक्रार दाखल केली आहे. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आता कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुरजी पटेल यांनी केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल केला आहे.