Devendra Fadnavis  Lokshahi
ताज्या बातम्या

पुणे मोक्का कोर्टात CBI चा धक्कादायक अहवाल, उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले;"गिरीश महाजनांवर कशाप्रकारे मोक्का..."

केंद्रीय अन्वेषण विभागाने पुणे मोक्का कोर्टात एक धक्कादायक अहवाल सादर केल्याची माहिती समोर आली आहे.

Published by : Naresh Shende

Devendra Fadnavis On Anil Deshmukh: केंद्रीय अन्वेषण विभागाने पुणे मोक्का कोर्टात एक धक्कादायक अहवाल सादर केल्याची माहिती समोर आली आहे. या अहवालामुळं माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख गृहमंत्री असताना जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंडे यांना धमकी दिली होती. विजय पाटील आणि गिरीश महाजन प्रकरणात धमकीचा आरोप होता,असा धक्कादायक अहवाल सीबीआयने पुणे मोक्का कोर्टात सादर केला. याविषयी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिली.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

सीबीआयने आरोपपत्र दाखल केलं आहे. गिरीश महाजनांवर कशाप्रकारे मोक्का लागला पाहिजे, असं त्या आरोपपत्रात स्पष्ट सांगण्यात आलं आहे. गिरीष महाजन यांच्यावर खोट्या केसेस लागल्या पाहिजेत. यासाठी गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांनी दबाव टाकला. हे गुन्हे दाखल करायला लावले. यांसंदर्भातले ऑडिओ, व्हिडीओ पुरावे मी स्वत: दिले होते. त्यावर सीबीआयकडे केस दाखल झाली. त्या केसमध्ये सीबीआयने पुराव्यासहीत कोर्टात आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कशाप्रकारे विरोधी पक्षाच्या आमदारांना मोक्का लावणे, खोट्या केसेसमध्ये फसवणे याची मोडस ऑपरेंडी होती, हे आपण सर्वांनी नीट पाहिलं आहे.

अंनिसचे संस्थापक श्याम मानव यांनीही अशाप्रकारचे गंभीर आरोप केले आहेत, यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, इतके वर्ष श्याम मानव मला ओळखतात. त्यांनी अशाप्रकारचे आरोप करण्याआधी मला विचारायला हवं होतं. पण इको सिस्टममध्ये अलीकडच्या काळाता सुपारीबाज लोक घुसले आहेत. सुपारी घेऊन बोलणारी लोकं घुसली आहेत. दुर्दैवाने त्यांच्या श्याम मानव त्यांच्या नादी लागले का? असा प्रश्न मला पडला आहे. पण एक गोष्ट मला स्पष्टपणे सांगायची आहे, याठिकाणी अनिल देशमुख यांच्यावर आरोप लागल्यानंतर आमचं सरकार नव्हतं.

महाविकास आघाडीचं सरकार होतं. ती केस मुंबई हाय कोर्टाच्या चीफ जस्टीससमोर लागली. त्यानंतर त्यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात एफआयआर करायला लावला. त्यांच्याच सरकारमध्ये तो एफआयआर झाला. त्यानंतर ते जेलमध्ये गेले. ते आता बेलवर बाहेर आहेत. ते सुटलेले नाहीत. १०० कोटींच्या वसुलीच्या केसमधून ते जामीनावर बाहेर आले आहेत. ते सातत्याने आरोप करत आहेत, तरीही मी शांत आहे. कारण मी अशाप्रकारचं राजकारण करत नाही. माझा एक सिंद्धांत पक्का आहे, मी कुणाच्या नादी लागत नाही. कुणी नादी लागला तर त्याला सोडत नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा