ताज्या बातम्या

कोरोना काळात वादात अडकलेल्या वाधवान यांच्या बंगल्यावर सीबीआयचा छापा

CBI Raids Wadhawan Brothers : कोटी रुपयांचे पेंटिंगचे साहित्य करणार सील

Published by : Sudhir Kakde

मुंबई : डीएचएफएल कंपनीचे (DHFL) प्रवर्तक वाधवान कुटुंबियांच्या (Wadhavan) महाबळेश्वर येथील बंगल्यावर सीबीआयने (CBI) छापा टाकला आहे. युनियन बँकेची (Union Bank) ३४,६१५ कोटींची फसवणूक केल्याबाबत सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. हा देशातील सर्वात मोठा बँक घोटाळा असल्याचे सांगण्यात येत आहे.

महाबळेश्वर येथील वाधवन बंधूंच्या बंगल्यावर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे. हजारो कोटींची फसवणूक आणि अफरातफर केल्याचा वाधवान यांच्यावर आरोप आहे. सीबीआयचे अधिकारी स्थानिक पोलिसांच्या ताफ्यासह वाधवान याच्या बांगल्यावर हजर झाले आहेत. परदेशी पेंटिंग्ज पोर्ट्रेट सील करून ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यांची किंमत कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात येते आहे. ते कुठून आले? कसे आणले, याची शहानिशा सीबीआयचे अधिकारी करत आहेत.

युनियन बँक ऑफ इंडियासह इतर बँकांची जवळपास ३४,६१५ कोटींची फसवणूक झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणी सीबीयआयने मुंबईत १२ ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. याप्रकरणी कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, कोरोना काळाच्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये वाधवन कुटुंबिय चांगलेच चर्चेत आले होते. कडक लॉकडाऊन असतानाही वाधवन कुटुंबिय महाबळेश्वर येथे मुंबईतून दाखल झाले होते. महाबळेश्वर येथे 5 एकर परिसरात वाधवान याचा बंगला असून पहिल्या लॉकडाऊनमध्ये वाधवान बंधुनी तत्कालीन प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांचे विशेष पत्र घेऊन महाबळेश्वर येथे प्रवेश केला होता तेव्हापासून वाधवान बंधू ईडीच्या ताब्यात आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा