ताज्या बातम्या

तरुणांच्या हुल्लडबाजीमुळे दुर्घटना? सीसीटीव्ही आलं समोर

गुजरातमध्ये नदीवरील पूल कोसळून सुमारे 500 जण नदीत पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती मोरबी इथल्या मच्छू नदीवर असलेला केबल पूल कोसळला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

गुजरातमध्ये नदीवरील पूल कोसळून सुमारे 500 जण नदीत पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती . मोरबी इथल्या मच्छू नदीवर असलेला केबल पूल कोसळला आहे. या पूलावर असणारे लोक नदीत पडल्याची माहिती समोर आली असून दुर्घटनेत 132 जणांचा मृत्यू झाला आहे.काही प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, केबल पूल कोसळल्यामुळे 500 लोक नदीत बुडाले आहेत. मच्छू नदीत कोसळलेला पूल पाच दिवसांपूर्वीच दुरुस्त करण्यात आला होता. दुर्घटनेची माहिती मिळताच बचवकार्य वेगानं सुरु करण्यात आले आहे. रुग्णवाहिका आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. गुजरातमधील मोरबी येथे माच्छू नदीवरील केबल पूल तुटल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. छठ पूजासाठी येथे शेकडो लोक उपस्थित राहिले होते.

याच पार्श्वभूमीवर आता नवीन सीसीटिव्ही फुटेज समोर आलं आहे. दरम्यान पूल कोसळतानाचं सीसीटीव्ही समोर आलं असून यामध्ये काही तरुण पूलावर उड्या मारताना दिसत आहेत. काही तरुणांनी पुलावर केलेल्या हुल्लडबाजीमुळेच दुर्घटना झाल्याचे म्हटले जात आहे. याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तरुणांची गर्दी असल्याचं दिसत आहे. यावेळी काही तरुण फोटोशूट करत असताना, त्यांच्या पुढे उभे असणारे तरुण पूलावर उड्या मारताना दिसत आहे. यादरम्यान पूल हालत असल्याचंही व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. यानंतर काही वेळातच पूल कोसळतो आणि सर्वजण खाली नदीत पडतात. हा व्हिडिओ भाजपा नेत्या प्रीती गांधी यांनीही ट्विट केला आहे.

मृतांच्या नातलगांना पंतप्रधान राष्ट्रीय साहाय्यता निधीमधून दोन लाखांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. तर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनीही मृतांच्या नातलगांना चार लाख तर जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर केली आहे.अहमदाबादचे रहिवासी विजय गोस्वामी जे या दुर्घटनेतून बचावले त्यांनी सांगितले की, “तरुणांकडून हा पूल मुद्दाम हलवला जात असताना नागरिकांना चालणंदेखील अवघड झालं होतं. याबाबत पूल कर्मचाऱ्यांना माहिती दिली होती. मात्र, त्यांनी कारवाई केली नाही. असे त्यांनी सांगितले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू