पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेचा देशभरात निषेध व्यक्त होत आहे. यातच बॉलीवूड कलाकारांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दा निषेध व्यक्त केला असून ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार अनुपम खेर, शाहरुख खान, विकी कौशल, मनोज वाजपायी, शाहिद कपूर, प्रीती झिंटा, अनुष्का शर्मा यांसह अनेक कलाकारांनी इंस्टा पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत.