Diabetes 
ताज्या बातम्या

Diabetes : ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी

शुगर नियंत्रणाबरोबर वजन घटवण्यातही मदत

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

  • ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी

  • शुगर नियंत्रणाबरोबर वजन घटवण्यातही मदत

  • लठ्ठपणाशी झगडणाऱ्या रुग्णांसाठीही हे उपयुक्त ठरू शकते

(Diabetes) भारत सरकारने टाईप-2 डायबिटीज रुग्णांसाठी डेनमार्कमध्ये विकसित झालेल्या सेमाग्लूटाइड या नव्या औषधाला मान्यता दिली आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (CDSCO) ने हे औषध भारतीय बाजारात आणण्याची परवानगी दिली असून ते ओजेम्पिक (Ozempic) या नावाने इंजेक्शन स्वरूपात उपलब्ध राहणार आहे. सेमाग्लूटाइड शरीरात इन्सुलिनसारखी भूमिका बजावते आणि “ग्लूकागन-लाइक पेप्टाइड-1 रिसेप्टर एगोनिस्ट” या गटात मोडते.

हे औषध विशेषतः अशा रुग्णांसाठी उपयुक्त मानले जात आहे ज्यांचा ब्लड शुगर फक्त आहार आणि व्यायामाने नियंत्रणात राहत नाही किंवा ज्यांच्यावर मेटफॉर्मिनसारखी पारंपरिक औषधे परिणाम करत नाहीत. तसेच, ही औषधं सहन न होणाऱ्या रुग्णांनाही याचा फायदा होऊ शकतो.

क्लिनिकल चाचण्यांमधून हे स्पष्ट झाले आहे की हे औषध केवळ ब्लड शुगर नियंत्रणात ठेवत नाही तर वजन कमी करण्यात देखील मदत करते. याशिवाय, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसारख्या गंभीर आजारांचा धोका कमी करण्यासही ते प्रभावी ठरते. त्यामुळे लठ्ठपणाशी झगडणाऱ्या रुग्णांसाठीही हे उपयुक्त ठरू शकते.

तज्ज्ञांच्या मते, हे औषध फक्त त्या रुग्णांसाठी आहे ज्यांच्यावर जुनी औषधे प्रभावी ठरत नाहीत. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय हे औषध स्वतःहून वापरू नये.

भारतामध्ये सध्या जवळपास 10.10 कोटी लोक डायबिटीजग्रस्त असून पुढील काही वर्षांत हा आकडा 13.6 कोटींवर जाण्याची शक्यता आहे. मात्र, या औषधाची किंमत रुग्णांसाठी कितपत परवडणारी ठरणार, हे मोठे आव्हान असेल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Bhagwangad : Dasara Melava : भगवानगडावरील दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे फोटो

Manoj Jarange Patil : दसरा मेळाव्याआधीच मनोज जरांगे पाटील यांचे, आव्हान म्हणाले...

PM Narendra Modi : RSSच्या शताब्दीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

Latest Marathi News Update live : राज्यात आज 5 दसरा मेळावे होणार