ताज्या बातम्या

Election Commission : मतदान प्रक्रियेत मोठा बदल! मतदान ओळखपत्र आधारकार्डसोबत लिंक होणार

केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. आता मतदार ओळखपत्र आधारकार्डसोबत लिंक करणे बंधनकारक असणार आहे.

Published by : Prachi Nate

राज्यातील तसेच देशातील राजकारणासंबंधी केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. देशातील तसेच राज्यातील मतदारांचे मतदार ओळखपत्रचे मतदाता नोंदणी क्रमांक म्हणजेच जो EPIC नंबर आधारकार्डाशी लिंक करणार असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासोबत डॉ. सुखबीर सिंह संधू, केंद्रीय गृहसचिव, विधिमंडळाचे सचिव आणि डॉ. विवेक जोशी यांची दिल्लीतील केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सदनात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रत्येक व्यक्तीला आपलं मतदान ओळखपत्र हे आधारकार्डशी लिंक करणं बंधनकारक असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतीय राज्य घटनेच्या कलम 326 आणि कलम 326 (अ) लोकप्रतिनिधीत्वचा कायदा असलेला कलम 23 (4), कलम 23(5), कलम 23 (6) अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने 177/223 या रिट पिटिशनमध्ये लावला होता. त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर आधारकार्ड तयार करणारी संस्था UIDAI मधील आणि निवडणूक आयोगातील इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी तज्ज्ञ यावर लवकरच काम सुरु करतील.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी