कर्मचाऱ्याच्या महागाई भत्त्यात घसघशीत वाढ करण्यात आली आहे. 1 जुलै 2023 पासून ही वाढ लागू होणार आहे. ही घोषणा घोषणा सेंट्रल पब्लिक एंटरप्राइजेज कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आली आहे. 1 जुलै 2023 पासून नवीन दरानूसार 3,500 रुपये प्रति मुळ पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 701.9 टक्के म्हणजे 15,428 लागू होणार आहेत.
9500 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 351 टक्के असेल. तो 40,005 रुपये असेल.6,500 रुपये 9,500 रुपये पगार बेसिक पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 421.1 टक्के वाढ होईल, ती रक्कम 34,216 रुपये असणार आहे. तसेच 3,501 रुपयांपासून 6,500 रुपये महिना पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 526.4 टक्के म्हणजे 24,567 रुपे होणार आहे.