नाशिक: नाशिकच्या गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर असतानाच आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या आईच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी पळवले आहे. नाशिकच्या आरटीओ रोड परिसरत सदर घटना घडली आहे.
शांताबाई बागुल या आरटीओ परिसरात भाजी खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी भारती पवार यांच्या आईच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसाकावून पळ काढला आहे. याप्रकरणी भारती पवार यांनी म्हसरुळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. परिसरातील सीसीटीव्ही च्या मदतीने आरोपींचा शोध सुरू आहे. या सर्व प्रकारामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.