Ramdas Athawale
Ramdas Athawale 
ताज्या बातम्या

"काँग्रेस, इंडीया आघाडीचे बारा वाजवायचे आहेत, म्हणून...", केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा विरोधकांवर घणाघात

Published by : Naresh Shende

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजल्यापासून सर्वच पक्षांमध्ये जागावाटपाबाबत रस्सीखेच सुरु आहे. अशातच या लोकसभा निवडणुकीत आरपीआयची भूमिका काय असणार? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. याबाबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी माध्यमांशी बोलताना काँग्रेससह इंडीया आघाडीवर सडकून टीका केली आहे. काँग्रेस, इंडीया आघाडीचे बारा वाजवायचे आहेत, म्हणून आम्ही भाजपसोबत आहोत. आम्हाला दोन जागा हव्या आहेत. शिर्डीची जागा मिळाली, तर मी निवडणूक लढण्यास उत्सुक आहे. सोलापूरची जागाही मिळावी, अशी आमची इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया आठवले यांनी दिली आहे.

आठवले माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाले, आमच्या नेत्यांनी भाजपसोबत चर्चा केली, पण जागावाटपात आमचं नाव येत नाही. नव्यांचं नाव येतंय. जुन्याचं येत नाही. आरपीआयच्या पाठिंब्यामुळे महायुती झाली. आरपीआयकडे लक्ष दिलं जात नाही, असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. सन्मान मिळावा ही अपेक्षा आहे. दोन जागा द्याव्यात, ही आमची आग्रही मागणी आहे. मी लवकरच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.

केंद्रात एक मंत्रिपद मिळावं, राज्यात एक मंत्रिपद मिळावं, दोन महामंडळ मिळावे, कार्यकर्त्यांना संधी मिळावी, एक विधानपरिषद मिळावी, विधानसभेच्या १०-१५ जागा मिळाव्यात. जर सन्मान मिळाला नाही, तर वेगळा विचार करावा लागेल. आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही. जागावाटपाबाबत भाजपकडून चर्चा केली जात नाही. शिर्डीतल्या जनतेची माझ्यासाठी आग्रही मागणी आहे, असंही आठवले म्हणाले.

IPL 2024 : चेन्नईच्या मैदानात आज MS धोनी खेळणार शेवटचा सामना? 'त्या' पोस्टमुळं चर्चांना उधाण

चंद्रशेखर बावनकुळेंना संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले; "काळू-बाळूच्या तमाशाने तुमच्या कानाखाली..."

आपल्या छातीवर धनुष्यबाण होता, पण आता मशाल आहे? निवडणुकीत काय परिणाम होणार? उद्धव ठाकरेंनी रोखठोक सांगितलं, म्हणाले...

Allu Arjun: मोठी बातमी! अभिनेता अल्लू अर्जुनविरोधात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

Sanjay Raut : 'नियमाप्रमाणे मोदींनी राजकारणातून निवृत्त व्हावं', राऊतांचा खोचक टोला