ताज्या बातम्या

Illegal Ticket Sales : तिकिटांच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाची मोठी कारवाई

तिकिटांचे हस्तांतरण, तिकीट दलालांवर मध्य रेल्वेच्या दक्षता (Illegal Ticket Sales) पथकाने कारवाई करण्याची मोहीम राबविली. या मोहिमेत वाहतूक दक्षता पथकाने जानेवारी ते मे या कालावधीत आठ ठिकाणी कारवाई केली.

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात

  • बेकायदेशीर तिकीट विक्रीची प्रकरणे उघडकीस

  • तिकिटांचे हस्तांतरण, तिकीट दलालांवर मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने कारवाई

  • जानेवारी ते मे या कालावधीत आठ ठिकाणी कारवाई केली.

तिकिटांचे हस्तांतरण, तिकीट दलालांवर मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने कारवाई करण्याची मोहीम राबविली. या मोहिमेत वाहतूक दक्षता पथकाने जानेवारी ते मे या कालावधीत आठ ठिकाणी कारवाई केली. यामध्ये अनेक गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे.

गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विविध ठिकाणी आठ प्रतिबंधात्मक तपासणी केल्या. पथकाने फेब्रुवारी २०२५ मध्ये अंबरनाथमध्ये सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सुरू असलेली बेकायदेशीर ई-तिकीट विक्री उघडकीस आली. आरोपींवर गुन्हा दाखल या प्रकरणी करण्यात आला असून हे प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शनानुसार बंद करण्यात आले आहे.

फेब्रुवारी महिन्यात पथकाने कोल्हापूरमध्ये ४ तिकीट दलालांना २५ हजार ५५७ किमतीच्या ४ तिकीटांसह अटक करण्यात आली. तर पुणे येथे डेक्कन जिमखाना पीआरएस येथेमार्च २०२५ मध्ये ३ तिकीट दलालांना १० हजार ५२० किमतीच्या ३ जेसीआर तिकीटांसह पकडले. एप्रिल २०२५ मध्ये ट्रेन क्र. प्रवाशांना खोट्या ओळखपत्र आणि हस्तांतरित तिकीटांसह ११०५५ मध्ये दोन प्रवास करताना पकडले. दोघांनाही रेल्वे नियमांनुसार दंड करण्यात आला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा