Padma Awards to 45 outstanding individuals from across the country, know the list...  
ताज्या बातम्या

Padma Awards : देशभरातील 45 उत्कृष्ट व्यक्तींना पद्म पुरस्कार, यादी जाणून घ्या...

प्रजासत्ताक दिनाच्या आधी केंद्र सरकारने 2026 सालच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून, देशभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.

Published by : Riddhi Vanne

प्रजासत्ताक दिनाच्या आधी केंद्र सरकारने २०२६ सालच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून, देशभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील काही व्यक्तींना मानाचा पद्म पुरस्कार मिळाल्याने राज्याचा गौरव वाढला आहे.

लोककलेत तमाशाला नवी ओळख देणारे कलाकार रघुवीर खेडकर, शेती क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे श्रीरंग लाड तसेच पालघरचे वारली लोकसंगीत जपणारे कलाकार भिकल्या लाडक्या ढिंका यांना यंदा पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. ग्रामीण कला, शेती आणि आदिवासी संस्कृती जपणाऱ्या या व्यक्तींच्या कामाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे.

देशातील विविध राज्यांतील समाजसेवा, कला, शिक्षण, आरोग्य आणि संस्कृती क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक मान्यवरांनाही यंदाच्या पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कारांमुळे शांतपणे समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तींच्या कामाला नवी ओळख मिळणार आहे. पद्म पुरस्कार ही केवळ सन्मानाची खूण नसून, प्रेरणादायी कार्याची पावती आहे, अशी भावना यानिमित्ताने व्यक्त होत आहे.

पद्म पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या व्यक्तीची नावे

भगवंदास रायकर (मध्य प्रदेश)
भिकल्या लडक्या धिंडा (महाराष्ट्र)
ब्रिज लाल भट्ट (जम्मू-कश्मीर)
चरण हेम्ब्रम (ओडिशा)
चिरंजी लाल यादव (उत्तर प्रदेश)
डॉ. पद्मा गुरमेट (जम्मू-कश्मीर)
कोल्लक्कयिल देवकी अम्मा जी (केरल)
महेंद्र कुमार मिश्रा (ओडिशा)
नरेश चंद्र देव वर्मा (त्रिपुरा)
ओथूवर तिरुथानी (तमिलनाडु)
रघुपत सिंह (उत्तर प्रदेश)
रघुवीर खेडकर (महाराष्ट्र)
राजस्तापति कालीअप्पा गौंडर (तमिलनाडु)
सांग्युसांग एस. पोंगेनर (नागालैंड)
श्रिरंग देवबा लाड (महाराष्ट्र)
थिरुवरूर बख्तवसलम (तमिलनाडु)
अंके गौड़ा (कर्नाटक)
आर्मिदा फर्नांडीस (महाराष्ट्र)
डॉ. श्याम सुंदर (उत्तर प्रदेश)
गफरुद्दीन मेवर्ती (राजस्थान)
खेम राज सुंद्रीयाल (हरियाणा)
मीर हाजीभाई कसामभाई (गुजरात)
मोहन नगर (मध्य प्रदेश)
नीलेश मंडलेवाला (गुजरात)
आर एंड एस गोडबोले (छत्तीसगढ़)
राम रेड्डी ममिडी (तेलंगाना)
सिमांचल पात्रो (ओडिशा)
सुरेश हनागवाड़ी (कर्नाटक)
तेची गूबिन (अरुणाचल प्रदेश)
युनम जत्रा सिंह (मणिपुर)
बुधरी ताथी (छत्तीसगढ़)
डॉ. कुमारासामी थंगाराज (तेलंगाना)
डॉ. पुण्णियामूर्ति नटेासन (तमिलनाडु)
हैली वॉर (मेघालय)
इंदरजीत सिंह सिद्धू (चंडीगढ़)
के. पाजनिवेल (पुडुचेरी)
कैलाश चंद्र पंत (मध्य प्रदेश)
नुरुद्दीन अहमद (असम)
पोकीला लेकटेपी (असम)
आर. कृष्णन (तमिलनाडु)
एस. जी. सुशीलेम्मा (कर्नाटक)
टागा राम भील (राजस्थान)
विश्व बंधु (बिहार)
धर्मिकलाल चूनीलाल पांड्या (गुजरात)
शफी शौक़ (जम्मू-कश्मीर)

थोडक्यात

  1. प्रजासत्ताक दिनाच्या आधी २०२६ सालच्या पद्म पुरस्कारांची केंद्रीय सरकारने घोषणा केली.

  2. देशभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.

  3. महाराष्ट्रातील काही व्यक्तींना हा मानाचा पद्म पुरस्कार मिळाल्याने राज्याचा गौरव वाढला आहे.

  4. पुरस्कार विविध क्षेत्रातील योगदानाची ओळख म्हणून दिला जातो.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा