ताज्या बातम्या

Vaishnavi Hagwane Case : 'आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल'; रुपाली चाकणकर यांचं आश्वासन

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील दोन फरार आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना आज पहाटे साडेचार वाजता बावधन पोलिसांनी अटक केली आहे.

Published by : Team Lokshahi

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. या प्रकरणातील दोन फरार आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना आज पहाटे साडेचार वाजता बावधन पोलिसांनी अटक केली आहे. ही अटकेची कारवाई पुण्यातील एका हॉटेलमध्ये करण्यात आली असून, आरोपी तिथे लपून बसल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले आहे. पोलीस तपासात असेही समोर आले आहे की, अटकेपूर्वी आरोपी मित्रांसह मटण पार्टी करत होते.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सांगितले की, "आयोगाने या प्रकरणात सुमोटो दाखल केला आहे. त्याचबरोबर पोलिसांकडे आधीच गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. एकूण पाच आरोपींपैकी तीन आधीच अटकेत होते, तर हे दोन आरोपी फरार होते. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी सर्व पोलीस यंत्रणा सतर्क असून, बावधन पोलिसांनी अखेर ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली आहे. आरोपींवर पुढे कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल," असेही चाकणकर यांनी स्पष्ट केले.

तसेच, चाकणकर म्हणाल्या की, सरकारकडून बालविवाह आणि महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी कठोर कायदे केलेले असले तरी काही नागरिकांना ते कायदे मोडण्यात रस आहे, ही खेदजनक बाब आहे. महिला आयोगाच्या वतीने अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी विविध जनजागृती कार्यक्रम राबवले जात आहेत.

दोन मुख्य आरोपींच्या अटकेनंतर वैष्णवी हगवणे प्रकरणाला आता नव्या तपासाची दिशा मिळणार असून, न्याय मिळवण्यासाठीचा मार्ग अधिक सुस्पष्ट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा