Chairs vandalized by rowdy youths in Ganeshotsav at Beed Team Lokshahi
ताज्या बातम्या

धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवात हुल्लडबाज तरुणांकडून खुर्च्यांची तोडफोड

या मंडपात आता तुटलेला खुर्च्यांचा ढीग पडलेला पाहायला मिळतोय.

Published by : Vikrant Shinde

विकास माने | बीड: बीडच्या परळी येथील नाथ प्रतिष्ठान आयोजित गणेश उत्सव पहिल्या दिवसा पासून चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे याचे अध्यक्ष आहेत. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी गणेशोत्सवात पहिल्याच दिवशी पोलिसांना लाठीमार करावा लागला होता. तर गणेशोत्सवाची सुरुवात ही लावणीने करण्यात आली. त्यामुळे हा गणेशोत्सव चर्चेत आला. मात्र याच दरम्यान झालेल्या टीकेला धनंजय मुंडे यांनी आपल्या शायरीच्या शैलीत प्रत्युत्तर दिलं होतं. तर आता पुन्हा एकदा या गणेशोत्सवात पुन्हा गोंधळ झाला आहे.

बीडच्या परळी येथील नाथ प्रतिष्ठान द्वारे आयोजित गणेशोत्सवात पुन्हा मोठा गोंधळ पाहायला मिळाला. तरुणांनी मोठ्या प्रमाणात खुर्च्यांची तोडफोड केलीय. त्यामुळे या मंडपात तुटलेला खुर्च्यांचा ढीग पडलाय. दरम्यान घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानचा गणेशोत्सव पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. पहिल्या दिवशी अश्लील नृत्य आणि लावण्या सादर करण्यात आल्या. त्यामुळे टीकेची झोड उठली होती. मंगळवारी मानसी नाईक आणि अभिनेत्री ईशा देओलच्या उपस्थित लावण्या महोत्सव झाला. यादरम्यान काही हुल्लडबाज तरुणांनी खुर्च्या डोक्यावर घेत खुर्च्याची तोडफोड केलीय.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा