लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे "पश्चिम महाराष्ट्र संवाद 2025" या कार्यक्रमाचे आयोजन द ऑर्किड हॉटेल पुणे येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्राचं राजकारण, सत्ताकारण, समाजकारण, पर्यटन, आरोग्य आदींसह सांस्कृतिक क्षेत्राबद्दल चर्चा केली जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्रच्या भूमीतून आलेल्या दिग्गज मान्यवरांचा सत्कार या कार्यक्रमात केला जाणार आहे. याचपार्श्वभूमिवर शिवसेना एकनाथ शिंदेंच्या पक्षातील रविंद्र धंगेकर यांनी देखील उपस्थिती लावली होती.
सध्या महायुतीमध्ये अंतर्गत कुरघोडी पाहायला मिळत आहेत. भाजप आणि शिवसेना शिंदेंच्या गटात काही नेत्यांमध्ये मतभेद पाहायला मिळत आहे. अलिकडेच धंगेकरांनी घायवळ शस्त्र परवाना प्रकरणावरुन भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. यावरुन भाजप नेत्यांमध्ये नाराजी पसरलेली पाहायला मिळाली. याचपार्श्वभूमिवर रविंद्र धंगेकर यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.