उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित येत आहेत. मात्र, राज ठाकरेंना भेटून मंत्री उदय सामंत हे जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्यासाठी भेटतात असा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी केला. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आता एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांना रसद पुरवत नाही. यामुळे नेते परत येत आहेत. चिमण्यांनो परत या हे वाक्य उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांना पाहून यशस्वी वाटतं, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युती संदर्भात ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे काय म्हणाले जाणून घ्या...