सध्या राज्यात ठाकरे बंधु एकत्र येणार असल्याच्या चर्चा आता सत्यात उतरताना पाहायला मिळत आहेत. नुकतीच झालेली बेस्ट निवडणुक देखील दोघांनी एकत्र मिळून लढवली. त्यानंतर आता उद्धव ठाकरे हे सहपरिवार राज ठाकरे यांच्या घरी दीड दिवसाच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. या गणेशोत्सवात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना गणपती दर्शनासाठी फोन करुन निमंत्रण दिलं असल्याची माहिती मिळाली आहे.
याचपार्श्वभूमिवर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नेते चंद्रकांत खैरे मोठा दावा केला आहे. पुढच्या गणेशोत्सवापर्यंत आमचा पक्ष खूप मोठा सत्तेत येणार आहे असं भाकीत चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला. शिवाय दोन भाऊ एकत्र आल्यामुळे खूप मोठा फरक दिसून येईल असाही चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.
यावेळी चंद्रकांत खैरे म्हणाले की, "छत्रपती संभाजी नगरमध्ये कोणत्याही कार्याची सुरुवात करायची असेल तर गणपतीची पूजा करायची ही आख्यायिका आहे. गेल्या अनेक वर्षापासून छत्रपती संभाजी नगर शहराची महानगरपालिका आमच्याकडे होती आणि सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे आहे हेच मी बोललेलो आहे".
"उद्धव साहेबांच्या नेतृत्वात महापालिका दे असं सुद्धा गणरायाला साकडं घातलं. कारण वातावरण बदलत चाललेल आहे बाकीचे सगळे आपापसात भांडत आहे त्यांचे भांडण सुरू झालेले आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचचं राज्य येईल".