माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी महायुतीमधील नेत्यांवर घणाघाती टीका केल्याच समोर आलं आहे. महायुती भाजप पक्षातील मंत्री चंद्रकांत बावनकुळे आणि महायुती शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे मंत्री शंभुराज देसाईंवर टीकास्त्र केलेलं आहे. 'कोण बावनकुळे?, ठाकरेंवर बोलण्याची त्यांची पात्रता नाही'.
तसेच उद्धव साहेबांसोबत बावनकुळे यांची योग्यता तरी आहे का ? तसेच बावनकुळे यांनी जास्त बोलू नये एवढचं मी त्यांना म्हणेन, असं म्हणत त्यांनी बावनकुळे यांच्यावर कडक शब्दांत टीकास्त्र केले आहे. त्याचसोबत शंभूराज देसाईंचा 'बोगस' असा उल्लेख करत त्यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.