ताज्या बातम्या

टिळकांना उमेदवारी दिल्यास निवडणूक बिनविरोध करणार का? चंद्रकांत पाटलांचा सवाल

Published by : Siddhi Naringrekar

विधान परिषद निवडणुकांनंतर आता पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे. कसबा विधानसभा मतदारसंघासाठी भाजपने आपला उमेदवार जाहीर केला आहे. आज काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. कसब्यात काँग्रेसकडून रविंद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

जर मुक्ता टिळक यांच्या घरी ही उमेदवारी दिली असती तर बिनविरोध करण्याचा विचार केला असता असे नाना पटोले यांनी म्हटले होते. यावर प्रतिउत्तर देत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीला कसबा पोटनिवडणूक बिनविरोध करायची नाही आहे. त्यामुळे टिळकांचं नाव वापरत आहेत. माझं नाना पटोलेंना आव्हान आहे की, जर टिळक कुटुंबात उमेदवारी दिली तर बिनविरोध करणार का?, असा सवाल चंद्रकांत पाटलांनी विचारला आहे.

यासोबतच ते म्हणाले की, महाविकास आघाडीचंच एकमत होत नाही आहे. चिंचवड मतदार संघात उमेदवारी लक्ष्मण जगतापांच्या कुटुंबात दिली आहे त्यामुळे चिंचवडमध्ये बिनविरोध निवडणूक होणार असं घोषित करुन टाका. असेही पाटील म्हणाले.

Rohit Pawar On Tanaji Sawant: रोहित पवारांचा तानाजी सावंत यांच्यावर जोरदार हल्लाबोल; ट्विट करत म्हणाले की...

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

DC VS RR: संजू सॅमसनची 86 धावांची खेळी व्यर्थ! दिल्ली कॅपिटल्सचा 20 धावांनी विजय

छगन भुजबळ यांच्या भेटीनंतर हेमंत गोडसे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Raosaheb Danve : जर सरकार आपलं आलं तर गरम गरम तव्यावर विधानसभेची पोळी लगेच भाजून घ्यावी लागणार