बीड प्रकरणावर बोलत असताना भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचं थेट नाव घेतलं. सुरेश धस यांनी म्हटले की, कोणाला भविष्यात इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स करायचं असेल, तर त्यांनी परळीला या. सपना चौधरी, रश्मिका मंधाना, प्राजक्ता माळीसुद्धा आमच्याकडे येतात.
कोणाला नवीन चित्रपट काढायचा असेल, तर अशा मोठ्या विभूती आहेत, त्यांच्या तारखा कशा मिळतात, त्याचे धडे इथे घेता येतील. प्राजक्ता ताईही आमच्या इथे येतात. इव्हेंटसाठी. आमचा परळी पॅटर्न आहे. असे सुरेश धस म्हणाले.
यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, वाद कुठलातरी दुसरा चालला आहे राजकीय आहे, सामाजिक आहे. संवेदनशील पण आहे. पण त्याच्यामध्ये अशा काही अभिनेत्रींचे नाव जोडणे सुरेशजी माझे मित्र आहेत.
मी त्यांना फोन करुन सांगणार आहे. सुरेशजी कोणाही महिलेची नाचक्की होईल, बदनामी होईल असं आपण काही बोलता कामा नये. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.