ताज्या बातम्या

Chandrakant Patil Kolhapur: प्राजक्ता माळीवर केलेल्या सुरेश धस यांच्या वक्तव्यावर, चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

चंद्रकांत पाटील यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. कोल्हापुरात मंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच दाखल झालेल्या पाटील यांनी नवीन शैक्षणिक धोरणाबाबतही चर्चा केली.

Published by : Prachi Nate

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा कोल्हापुरात जंगी स्वागत मंत्रीपद मिळाल्यानंतर चंद्रकांत दादा पाटील पहिल्यांदाच कोल्हापुरात दाखल झाले. यानंतर ते माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, मी मूळचा कोल्हापूरचाच आहे... 2019 ला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पद मंत्रीपद मिळाल तेव्हा सर्वांना वाटलं दादांना बाजूला केलं. मात्र काही जणांना माहीत होतं 2020 साली नवीन शैक्षणिक धोरणाची घोषणा होणार आहे.

त्यावेळी जुना अनुभव असलेला शिक्षण मंत्री हवा होता. मी विद्यार्थी परिषदेत काम केल्याने मला हे सर्व माहीत होतं. यामुळे आम्ही देशात नवीन शिक्षण धोरण राबवण्यात दुसरे आलो.हे पुढे आणखी चालवायचा आहे एकाच माणसाकडे सलग खात राहिलं तर आणखी बरंच काही करता येईल म्हणून हेच खात पुन्हा मला मिळालं. जबाबदाऱ्या अनेक वाढल्या मात्र केंद्र कोल्हापुरात राहिलं कोल्हापूरची नाळ कधी सुटली नाही, कुठली नाही आणि तुटणारही नाही. आमचा शंभर दिवसाचा रोड मॅप तयार आहे... त्याचा प्रेझेंटेशन देखील झालेला आहे. प्राध्यापकाने कोणत्याही भाषेत शिकवलं तर विद्यार्थ्याला मराठी भाषेत कळावं असं सॉफ्टवेअर देखील डेव्हलप करण्यात आलेला आहे

बीड प्रकरण देवेंद्र फडणवीस यांनी कधी डावा उजवा असं केलं नाही

देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सहा दिवसाचं अधिवेशन असून देखील जवळजवळ चार ते साडेचार तासाचा चर्चेला विषय दिला.... सर्वांनी आपल्या भावना मांडल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा उत्तर दिलं, त्यात त्यांनी कोणताही शंका ठेवलेली नाही... त्यांनी स्पष्टपणे सांगितलेल होत की, मी कोणाचाही मुलायजा ठेवणार नाही त्यानुसार ते पावलं उचलत आहेत. प्रत्येकाने भावना व्यक्त करणे यात काही गैर नाही मात्र देवेंद्र फडणवीस कोणालाही सोडणार नाहीत. धनंजय मुंडे यांच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस ठरवतील, देवेंद्र फडणवीस यांनी कधीही डावा उजवा असं केलं नाही.

अभिनेत्रीच नाव जोडणं सुरेश धस यांना शोभत नाही- चंद्रकांत पाटील

बीड हत्याप्रकरणी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्यावर आमदार सुरेश धस यांनी एक वक्तव्य केलं होत. ज्यामुळे प्राजक्ता माळीने देखील प्रत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. याच वादावर आता चंद्रकांत पाटील म्हणाले की, आमदार सुरेश धस हे कधीचं चुकीची गोष्ट बोलत नाही, स्वतःचा विचार न करता त्यांनी जे चुक आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे... पण आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीच चारित्र आणि त्यांच्यावर शिंतोडे उडू नये याची नेहमी काळजी घेतली.....

राजकीय वाद सुरू आहे, यामध्ये काही प्रमाणात सामाजिक आणि संवेदनशील पण आहेत, यामध्ये अभिनेत्रीच नाव जोडणं सुरेश धस यांना शोभत नाहीत. सुरेश धस यांनी कोणत्याही महिलेची नाचक्की आणि बदनामी होईल, असं बोलता कामा नये. प्राजक्ता माळी यांनी देखील काल प्रेस घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मी सुरेश धस यांना स्वतः विनंती करणार आहे, पार्टीचा आमदार असून देखील तुम्ही असं काम करत आहे. तुम्ही पार्टीचे आमदार आहात तुम्ही पार्टीच्या अंतर्गत बोला असं बोलू नका, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात