ताज्या बातम्या

'यावरही भ्रष्टलेख लिहा' मल्लिकार्जुन खरगेंचा 'तो' व्हिडीओ ट्विट करत बावनकुळेंचा राऊतांना खोचक टोला

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या सामनाच्या ‘रोखठोक’ या सदरामध्ये ‘नितीन गडकरी यांना पाडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र प्रयत्न केले’,

Published by : shweta walge

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या सामनाच्या लेखामध्ये ‘नितीन गडकरी यांना पाडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र प्रयत्न केले’, असा गंभीर आरोप केला होता. यावरच प्रत्युत्तर देत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा एक व्हिडीओ ट्विट करत संजय राऊतांनी यावरही भ्रष्टलेख लिहावा, असा खोचक सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांचं ट्विट

“संजय राऊत…तुमचे नेते मल्लिकार्जुन खरगे बघा काय म्हणतात? आदरणीय मोदीजींवर टीका करण्याआधी मल्लिकार्जुनबुवांचा हा व्हिडीओ बघा! आणि ठरवा. मल्लिकार्जुनबुवा खरगे स्वतःला देवाचे अवतार म्हणू लागले. ‘मेरा नाम है मल्लिकार्जुन खरगे.. मैं ईश्वर का अवतार हूं…’ यांच्यावरही भ्रष्टलेख लिहा”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

संजय राऊतांनी काय म्हटलं होतं?

संजय राऊत यांनी ‘सामना’मध्ये लिहिलेल्या लेखामध्ये मोठा दावा केला होता. ते म्हणाले होते, “नितीन गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा, यासाठी मोदी-शाह-फडणवीस यांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरींचा पराभव होत नाही, याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाइलाजाने नागपुरात प्रचारात उतरले. गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात”, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Saamana Editorial : 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवून त्यांनी...'; 'सामना'तून सरकारवर साधला निशाणा

Shubhanshu Shukla Axiom 4 : शुभांशु शुक्लानं ISS च्या कक्षेत पूर्ण केला एक आठवडा; सांगितलं पुढील कामाचं नियोजन

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्यामुळे वाहतुकीत मोठे बदल

PM Narendra Modi : महाकुंभातील संगम आणि सरयू नदीचे पवित्र पाणी, राम मंदिराची प्रतिकृती; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या या खास भेटवस्तू