ताज्या बातम्या

Chandrashekhar Bawankule : छगन भुजबळ साहेबांनी घेतलेला पुढाकार योग्य

छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली.

Published by : Siddhi Naringrekar

छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यावर राजकीय वर्तुळातून अनेक चर्चा रंगल्या. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ओबीसी आणि मराठा या दोन समाजामध्ये सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण पाहिजे आहे ते दिलं पाहिजे. त्याकरता महाराष्ट्राचे सर्वच पक्ष, आम्ही सर्व विधिमंडळ मराठा समाजाच्या पाठिशी आहे.

यासोबतच ओबीसीतून हे आरक्षण देऊ नये. याकरता शरद पवार साहेबांची आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांची भूमिका आहे ती स्पष्टपणे येत नाही. त्यामुळे छगन भुजबळ साहेबांनी घेतलेला पुढाकार योग्य आहे.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, शरद पवारांशी भेटून सामाजिक प्रश्नावर सर्वच पक्षांनी मदत करावी. शेवटी महाराष्ट्राचा सामाजिक सलोखा कायम राहावा. यासाठी घेतलेला पुढाकार आहे. त्यामुळे छगन भुजबळ साहेबांची विनंती शरद पवार साहेब मान्य करतील असं मला वाटतं. असे बावनकुळे म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Saamana Editorial : 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवून त्यांनी...'; 'सामना'तून सरकारवर साधला निशाणा

Shubhanshu Shukla Axiom 4 : शुभांशु शुक्लानं ISS च्या कक्षेत पूर्ण केला एक आठवडा; सांगितलं पुढील कामाचं नियोजन

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्यामुळे वाहतुकीत मोठे बदल

PM Narendra Modi : महाकुंभातील संगम आणि सरयू नदीचे पवित्र पाणी, राम मंदिराची प्रतिकृती; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या या खास भेटवस्तू