Chandrashekhar Bawankule  Team Lokshahi
ताज्या बातम्या

महाविकास आघाडीचे नेतेच अजित पवार यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात - चंद्रशेखर बावनकुळे

अहमदनगर येथे जिल्हा तालीम संघ भाजप आणि शिवसेना यांच्या पुढाकाराने कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

संतोष आवारे, अहमदनगर

अहमदनगर येथे जिल्हा तालीम संघ भाजप आणि शिवसेना यांच्या पुढाकाराने कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती शिवराय केसरी राज्य निमंत्रित कुस्ती अस या स्पर्धेला नाव देण्यात असून राज्यभरातून बाराशे कुस्तीगीर सहभागी झाले आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.सध्या ज्या वावड्या उडतायेत त्यामध्ये तथ्य नसून भारतीय जनता पार्टीकडे आजपर्यंत तसा कोणताही प्रस्ताव आलेला नाही मागच्या तीन महिन्यांपासून राज्याचे विरोधी पक्ष नेतेही मला भेटलेले नाहीत महाविकास आघाडीचे नेते मात्र अजित दादा पवार यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

North Korea Ban Ice Cream Word : उत्तर कोरियात ‘आईस्क्रीम’ शब्द नॉट अलाऊट! किम जोंग उनचा नवा हुकूम

Lipstick Shades : जाणून घ्या, कोणत्या स्किन टोनवर कोणती लिपिस्टिक सुंदर दिसते

Chhagan Bhujbal : "मिळालेलं आरक्षण नको आहे का?" छगन भुजबळांचा मराठा समाजाला थेट सवाल!

Uddhav Thackeray On PM Modi : "मोदींच्या मनात पाप असलं तरी मी..." उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका