राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यानंतर खातेवाटप झाले आता चर्चा सुरु आहे ती पालकमंत्रिपदाची. पालकमंत्रिपदाबाबत राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, फार जास्त वाट पाहायची गरज नाही आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. पण मला असं वाटतं की, एक दोन दिवसांमध्ये हा निर्णय नक्की होईल. असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.