Chandrayaan-3 Team Lokshahi
ताज्या बातम्या

Chandrayaan-3 साठी मुंबईतील 'गोदरेज'चं इंजिन अन् बुलढाण्यातील चांदी

Chandrayaan-3 या मोहिमेसाठी महाराष्ट्राचाही मोठा वाटा आहे.

Published by : shweta walge

संपूर्ण जगाचं लक्ष भारताच्या 'मिशन मून' कडे लागलं आहे. चांद्रयान ३ श्रीहरीकोटा येथील तळावरून शुक्रवारी यशस्वीपणे अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्ट रोजी ते चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे. आता त्याचा चंद्रापर्यंतचा 40 दिवसांचा प्रवास सुरु झाला आहे. भारतीयांसाठी अभिमान वाटणाऱ्या या मोहिमेसाठी महाराष्ट्राचाही मोठा वाटा आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रानेही महत्वाची कामगिरी बजावली आहे.

भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेसाठी गोदरेज समूहाच्या गोदरेज एरोस्पेस कंपनीने इस्रोला इंजिनासह काही महत्त्वपूर्ण भाग पुरवले आहेत. इंजिनासाठीचे महत्त्वाचे भाग गोदरेजच्या मुंबईतल्या विक्रोळी प्लांटमध्ये तयार करण्यात आले आहेत. गोदरेज कंपनीने अंतराळ प्रकल्पांसाठी लिक्विड प्रोपल्शन इंजिन, सॅटेलाइट थ्रस्टर्स आणि कंट्रोल मॉड्यूल या भागांसह इंजिनचे काही भाग पुरविले आहेत.

चांद्रयान-3 या मोहिमेत राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेली चांदी आणि फॅब्रिक्स चांद्रयान-3 मोहिमेत वापरण्यात आलं आहे. त्यामुळे आता खामगावसह राज्यासाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. खामगावची चांदी ही शुद्ध आणि वजनाने हलकी असल्याने चांद्रयान-3 साठीच्या स्टर्लिंग ट्यूबमध्ये ही चांदी वापरण्यात आली आहे. सोबतच चांद्रयानाला उष्णतेपासून वाचवण्यासाठी आवश्यक असणारा रबराईज्ड फॅब्रिक खामगाव येथील भिकमची फॅब्रिक्सने तयार केला आहे. याचा वापर चांद्रयान-3 मोहिमेत करण्यात आला आहे.

चांद्रयान-3 मोहिमेसाठी पुण्यातील जुन्नर तालुक्यातील दोन सुपुत्रांनी महत्त्वाची आणि अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. या मोहिमेत असिफभाई महालदार आणि मयुरेश शेटे यांचं योगदान आहे. असिफभाई महालदार हे रिलायन्स फायर सिस्टीम या कंपनीत आहे तर मयुरेश शेटे हे इस्त्रोमध्ये शास्त्रज्ञ आहे. राजुरी गावातील मयुरेश शेटे हे इस्त्रोत शास्त्रज्ञ आहेत. या चांद्रयान मोहिमेत मोठा सहभाग आहेत. सिनियर सायंटिस्ट म्हणून शेटे काम पाहतात. त्यांनीदेखील मोठी मेहनत करत चांद्रयान-3 या मोहिमेत सहभाग घेतला होता. त्यांचे वडिल राजुरीत प्राचार्य आहेत आणि मयुरेश यांचं प्राथमिक शिक्षण राजुरीतील शिक्षण विद्या विकास मंदिर येथे झालं आहे.

चांद्रयान-3 मोहिमेमध्ये पुण्याच्या इंदापूरमधील वालचंदनगर कंपनीला मोलाचा वाटा आहे. चांद्रयान-3 मध्ये वापरण्यात आलेले चार बूस्टर वालचंदरनगर कंपनीने तयार केले आहेत. या बूस्टरमध्ये घनस्वरुपात इंधन भरले जाते. मोहिमेच्या पहिल्या स्टेजसाठी याचा उपयोग होतो. यामध्ये हेड एन्ड सेगमेंट, मिडल सेगमेंट, नोझल एन्ड सेगमेंट तसेच प्लेक्स नोझल कंट्रोल टॅक या महत्त्वाच्या उपकरणांचा समावेश आहे.

चंद्रयान मोहिमेदरम्यान काही धोका झाला तर मोठी आग लागण्याची शक्यता असते. त्यामुळे मोठी यंत्रणा तैनात ठेवावी लागते. ही अग्निशामक यंत्रणा असिफभाई महालदार यांच्या रिलायन्स फायर सिस्टीम या कंपनीने पुरवली होती. श्रीहरिकोटा येथे ही यंत्रणा स्थापित करण्यात आली होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pune Crime Update : पुण्यात गणेश विसर्जनाच्या आधी गोळीबार, गँगवॉरचा भयंकर उद्रेक!

Latest Marathi News Update live : गणपती विसर्जन आणि ईदनिमित्त यवतमाळमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त...

Anant Chaturdashi 2025 : बाप्पाला निरोप देताना "अनंताचा धागा" का बांधतात जाणून घ्या यामागचं महत्त्व

Anant Chaturdashi 2025 Wishes : निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी...! अनंत चर्तुदशीनिमित्त गणेशभक्तांना पाठवा खास शुभेच्छा, WhatsApp, Facebook च्या माध्यमातून ठेवा कोट्स स्टेटस