ताज्या बातम्या

चांद्रयान -3चे काऊंटडाऊन सुरू; चांद्रयान-3 आपला ड्रीम प्रोजेक्ट लॉन्च करणार

चांद्रयान-3च्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागाची माहिती गोळा करण्यासाठी इस्रो सज्ज झाले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

चांद्रयान-3च्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागाची माहिती गोळा करण्यासाठी इस्रो सज्ज झाले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था आज, शुक्रवारी चांद्रयान-3 हा आपला ड्रीम प्रोजेक्ट लॉन्च करणार आहे.

सुमारे 45 ते 50 दिवसांच्या प्रवासानंतर चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरेल.सप्टेंबर 2019मध्ये ही मोहीम शेवटच्या क्षणी अयशस्वी झाली होती. आता जर ही मोहीम यशस्वी झाली तर भारत चंद्राच्या पृष्ठभागावर अवकाशयान उतरवणारा जगातील चौथा देश बनेल.

एलव्हीएम-3 (LVM-3) रॉकेटद्वारे चंद्रयान-3 दुपारी 2:35 वाजता पृथ्वीवरून चंद्राच्या दिशेने झेप घेईल. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून चांद्रयान-3 प्रक्षेपित करणार आहे. यापूर्वी अमेरिका, पूर्वीचे सोव्हिएत युनियन आणि चीन यांनी असे सॉफ्ट-लॅँडिंग केले आहे. चांद्रयान-2प्रमाणेच चांद्रयान-3मध्ये लँडर आणि रोव्हर कॉन्फिगरेशनचा समावेश आहे, ज्याला प्रोपल्शन मॉड्यूलद्वारे 100 किमी चंद्राच्या कक्षेत नेले जाईल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा