ताज्या बातम्या

चांद्रयान -3चा महत्त्वाचा टप्पा पार; चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश

देशाची महत्त्वाकांक्षी चांद्रयान मोहीम आपल्या लक्ष्याकडे वाटचाल करत आहे. चांद्रयान-३ ने शनिवारी यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला

Published by : Shweta Shigvan-Kavankar

बंगळुरू: देशाची महत्त्वाकांक्षी चांद्रयान मोहीम आपल्या लक्ष्याकडे वाटचाल करत आहे. चांद्रयान-३ ने शनिवारी यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. इस्रोने आपल्या एका ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. मॉक्स इस्ट्रॅक मी चांद्रयान-3, मला चंद्राचं गुरुत्वाकर्षण जाणवत आहे, असा संदेश यानाने इस्त्रोला पाठवला आहे.

चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या पोहोचल्यानंतर आता पुढचे मिशन 6 ऑगस्ट 2023 ला रात्री 11 वाजता पूर्ण होणार आहे, यामध्ये चांद्रयान-3 त्याची कक्षा आणखी कमी करणार आहे. चांद्रयान-3 ने 14 जुलै रोजी प्रक्षेपण केल्यापासून चंद्राच्या जवळपास दोन तृतीयांश अंतर कापले आहे. 1 ऑगस्ट रोजी यानाला पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या दिशेने जाण्याची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आणि यानाला 'ट्रान्सलुनर ऑर्बिट'मध्ये ठेवण्यात आले. यापूर्वी, 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 'सॉफ्ट लँडिंग' करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे म्हटले होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा