Mark Zuckerberg on new policy of Meta 
ताज्या बातम्या

Meta Policy मध्ये अत्यंत महत्त्वाचे बदल, फॅक्ट चेकिंग प्रोग्रॅम बंद

मेटाने आपल्या धोरणांमध्ये बदल केला आहे. मुक्त अभिव्यक्तीसाठी थर्ड पार्टी फॅक्ट चेकिंग प्रोग्रॅम ऐवजी आता कम्युनिटी नोट्सचा वापर केला जाणार आहे.

Published by : Gayatri Pisekar

व्यक्त होण्याचं माध्यम म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा उदय झाला. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सच्या माध्यामातून आपण सोशल मीडियावर व्यक्त होत असतो. मात्र, फेसबुक म्हणजेच मेटा या प्लॅटफॉर्मवर अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबतीत सवाल उपस्थित केले जात होते. कंटेट मॉडरेशनच्या पॉलिसीनुसार अनेक वापरकर्त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत होता. मात्र, आता मेटाचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी मेटाच्या पॉलिसीमध्ये मोठे बदल केल्याचं जाहीर केलं आहे.

थर्ड पार्टी फॅक्ट चेकिंग प्रोग्रॅम रद्द

Meta ने आपल्या कंटेंट मॉडरेशन आणि तथ्य-तपासणी धोरणांमध्ये मोठा बदल केला आहे. कंपनीने सांगितले की, आता थर्ड पार्टी फॅक्ट चेकिंग प्रोग्रॅम समाप्त करत आहोत. त्याऐवजी कम्युनिटी नोट्स (Community Notes) या मॉडरेशन पद्धतीकडे वळणार आहे. हा बदल मुक्त अभिव्यक्तीच्या वचनबद्धतेकडे परत जाण्याचा Meta चा एक प्रयत्न आहे.

थर्ड पार्टी फॅक्ट चेकिंग प्रोग्रॅममध्ये त्रुटी

2016 मध्ये Meta ने थर्ड पार्टी फॅक्ट चेकिंग प्रोग्रॅम सुरू केला होता. ज्याचा उद्देश म्हणजे लोकांना व्हायरल होणाऱ्या फसवणुकीच्या गोष्टींबद्दल अधिक माहिती देणे, जेणेकरून ते त्यावर स्वतः निर्णय घेऊ शकतील. पण, वेळोवेळी Meta ने अनुभवले की या पद्धतीत काही त्रुटी आहेत. तथ्य तपासणारे, इतर सर्वांसारखे, त्यांचेही पूर्वाग्रह आणि दृष्टीकोन असू शकतात, ज्यामुळे काही मुद्द्यांवर चुकीच्या निर्णय घेऊ शकतात.

आता सेल्फ रेटिंगसाठी कम्युनिटी नोट्सचा वापर

आता मेटा कम्युनिटी नोट्स (Community Notes) वापर वाढवणार आहे. ज्या पद्धतीमध्ये वापरकर्ते स्वतःच पोस्टमध्ये असलेल्या माहितीसाठी अधिक संदर्भ देऊ शकतात. यामध्ये, प्रत्येक वापरकर्त्याला एखाद्या पोस्टला रेट करण्याची आणि त्याला अधिक माहिती देण्याची संधी मिळेल. यामुळे पक्षपातीपणा कमी होईल आणि अधिक पारदर्शकता प्राप्त होणार असल्याचा मेटाला विश्वास आहे.

काही कमी गंभीर कंटेंटवरील मॉडरेशन कमी

थर्ड पार्टी फॅक्ट चेकिंग प्रोग्रॅम समाप्त करताना, मेटा आपल्या ध्येयाशी सुसंगत राहून, राजकीय भाषण, समाजिक मुद्दे आणि निवडणुकांवरील चर्चासाठी अधिक अनुकूल असेल. मेटाने म्हटले की, काही कमी गंभीर कंटेंटवरील मॉडरेशन कमी केले जाईल. फक्त बेकायदेशीर आणि उच्च-तीव्रतेच्या कंटेटवर लक्ष केंद्रित केले जाईल. यामुळे वापरकर्ते अधिक मोकळेपणाने आपले विचार व्यक्त करू शकतील. मात्र, समाजात द्वेष पसरवणाऱ्या, हानी पोहचवणाऱ्या कंटेंटवर लक्ष ठेवले जाईल.

कंटेट प्रदर्शित करण्याच्या पद्धतीत बदल करत, मेटा वापरकर्त्यांना अधिक पर्सनलाईज्ड अनुभव देण्याचा प्रयत्न करणार आहे. 2021 पासून वापरकर्त्यांच्या फीडबॅकनुसार, Meta ने नागरी आशय कमी करण्यासाठी काही बदल केले होते. पण आता ते वापरकर्त्यांच्या इच्छेनुसार अधिक राजकीय आणि समाजिक मुद्द्यांवर आधारित कंटेंट प्रदर्शित करणार आहे.

या बदलांद्वारे मेटा मुक्त अभिव्यक्तीसाठी आपल्या वचनबद्धतेला नवा आकार देत आहे आणि वापरकर्त्यांना चुकलेले निर्णय पुन्हा तपासण्याची आणि अधिक संवाद साधण्याची संधी देत आहे. पुढील काही महिन्यांत या बदलांची अंमलबजावणी होईल.

सविस्तर माहितीसाठी क्लिक करा.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल

Mobile Hang Problem: मोबाईल सतत होतोय हँग? जाणून घ्या कारण...