ताज्या बातम्या

चिंतामणी गणपतीच्या आगमनासाठी मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत बदल

Published by : Siddhi Naringrekar

कोरोनाच्या तब्बल दोन वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. गणपतीच्या आगमनाला सुरुवात देखिल झाली आहे. आज चिंचपोकळीच्या चिंतामणीचे आगमन होणार आहे. या आगमनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात आला असून याची माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

सकाळी 12 ते रात्री 10 वाजे दरम्यान वाहतूक नियमनाच्या दृष्टीने खबरदारी घेत काही मार्ग बंद असतील. नागरिकांना विनंती आहे त्यांनी उपलब्ध पर्यायी मार्गांचा अवलंब करण्यात यावे असे सांगण्यात आले आहे. सकाळी 12 ते रात्री 10 वाजे दरम्यान डॉ.बी.ए.रोड दक्षिण वहिनी भारतमाता जंक्शन ते बावला कंपाऊंड जंक्शनपर्यंत बंद राहील. नागरिकांनी करी रोड ब्रीज- आर्थर रोड नाका अथवा नाईक चौक-बॅरिस्टर नाथ पै मार्ग या मार्गांचा अवलंब करावा.

सकाळी 12 ते रात्री 10 वाजे दरम्यान डॉ.बी.ए.रोड उत्तर वहिनी बावला कंपाऊंड जंक्शन ते भारतमाता जंक्शनपर्यंत बंद राहील. नागरिकांनी टी.बी.कदम मार्ग - अल्बर्ट जंक्शन या मार्गाचा अवलंब करावा. सकाळी 12 ते रात्री 10 वाजे दरम्यान चिंचपोकळी जंक्शन ते साने गुरुजी मार्ग वाहतुकीसाठी बंद राहील. नागरिकांनी एन.एम.जोशी मार्ग ते खडापारसी जंक्शन या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. असे पोलिसांकडून सांगण्यात आला आहे.

"मोदी पराभवाच्या भीतीमुळं निवडणूक आयोगाचा वापर घरगड्यासारखा करतात"; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

IPL 2024 Play Offs : प्ले ऑफचा सामना पावसामुळं रद्द झाल्यास पुढे काय होणार? जाणून घ्या सविस्तर माहिती

EVM मशिनला हार घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शांतीगिरी महाराजांनी दिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले...

मतदानाचा टक्का का घसरला? आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत निवडणूक आयोगाला केली 'ही' विनंती

मोठी बातमी! EVM मशिनला हार घातल्याप्रकरणी शांतीगिरी महाराजांवर गुन्हा दाखल