ताज्या बातम्या

Agriculture News : सातबारा उताऱ्याच्या नियमांत बदल ; भूमिअभिलेख विभागाचा मोठा निर्णय

सातबारा उताऱ्यांवरील फेरफार नोंदणी आता फक्त ऑनलाईन

Published by : Shamal Sawant

सातबारा उताऱ्यांवरील चुकांची दुरुस्तीसाठी भूमिअभिलेख विभगाने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 मधील कलम 155 च्या वापराबाबत आता दुरुस्ती केली आहे. या कलमाअंतर्गत आता फेरफार नोंदणी केवळ ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारली जाणार आहे. जाणून घेऊया हे नवीन बदल काय आहेत ते?

ऑनलाईन पडताळणी अनिवार्य

तलाठ्याच्या लॉगिनवर आदेश प्राप्त झाल्यानंतर, त्या आदेशाची नोंद कुणी, कधी आणि कशी केली याची ऑनलाईन पडताळणी केली जाणार आहे.

नोंदींसाठी निश्चित वेळमर्यादा

फेरफार नोंदी एकाच दिवसात ऑनलाईन प्रणालीत करणे बंधनकारक असणार आहे. मात्र महसूल कार्यालयातील इतर प्रक्रिया मात्र विहित मुदतीनुसार पार पाडाव्या लागतील.

ऑनलाईन आदेशच वैध

कलम 155 अंतर्गत यापुढे सर्व आदेश फक्त ऑनलाईन स्वरूपात दिले जातील. कुठल्याही स्वरूपात ऑफलाइन फेरफार करण्यास सक्त मनाई आहे.

न्यायालयीन आदेशांचाही ऑनलाईन समावेश

महसूल न्यायालय किंवा अर्थन्यायिक न्यायाधिकरणांद्वारे दिले जाणारे आदेशही ऑनलाईन प्रणालीतच नोंदवले जाणार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात