Mumbai Traffic: गोकुळाष्टमी आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वाहतूक व्यवस्थेतबदल ; अधिक माहितीसाठी सविस्तर वाचा... Mumbai Traffic: गोकुळाष्टमी आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वाहतूक व्यवस्थेतबदल ; अधिक माहितीसाठी सविस्तर वाचा...
ताज्या बातम्या

Mumbai Traffic : गोकुळाष्टमी आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वाहतूक व्यवस्थेतबदल ; अधिक माहितीसाठी सविस्तर वाचा...

गोकुळाष्टमी सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असून, राज्यभरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Published by : Riddhi Vanne

गोकुळाष्टमी सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असून, राज्यभरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. दहीहंडी या मुख्य आकर्षणाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईत विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी विशेष उपाययोजना केल्या आहेत.

मुंबईतील विलेपार्ले (पश्चिम) येथील हरे राम हरे कृष्ण मंदिर (इस्कॉन) परिसरात मोठ्या संख्येने भाविक जमा होण्याची शक्यता असल्यामुळे, सांताक्रूझ वाहतूक विभागाच्या हद्दीत वाहतुकीत खालीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत. दरम्यान १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४:०० वाजल्यापासून ते १६ ऑगस्ट रोजी पहाटे २:०० वाजेपर्यंतत, १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४:३० वाजल्यापासून ते १७ ऑगस्ट रोजी पहाटे २:०० वाजेपर्यंत बंद करण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

नो पार्किंग झोन घोषित केलेली ठिकाणे:

जनार्दन म्हात्रे रोड

मुक्तेश्वर देवालय मार्ग

जुहू चर्च रोड

गांधीग्राम रोड

अल्फ्रेड क्रीयाडो रोड

संत ज्ञानेश्वर मार्ग

श्यामराव परुळेकर मार्ग (एन.एस. रोड क्र. १३)

बलराज साहनी रोड

ए.बी. नायर रोड

देवळे रोड (मिलिटरी रोड)

प्रवेशबंदी लागू असलेले मार्ग:

चांडोक चौक ते मुक्तेश्वर देवालय मार्ग (उत्तर ते दक्षिण):

फक्त आपत्कालीन सेवा, व्हीव्हीआयपी वाहने, मंदिर पासधारक आणि स्थानिक रहिवाशांना प्रवेश.

अल्फ्रेड क्रीयाडो रोड ते मुक्तेश्वर देवालय मार्ग (दक्षिण ते उत्तर)

सर्वसामान्य वाहनांसाठी बंद.

श्यामराव परुळेकर मार्ग (एन.एस. रोड क्र. १३) ते संत ज्ञानेश्वर मार्ग:

संत ज्ञानेश्वर मार्ग ते देवळे रोड जंक्शन (पूर्व ते पश्चिम):

एकमार्गी वाहतूक व्यवस्था:

मुक्तेश्वर देवालय मार्ग व देवळे रोड जंक्शन ते जेव्हीपीडी जंक्शन (पश्चिम ते पूर्व)

वाहतूक एकमार्गी.

संत ज्ञानेश्वर मार्ग ते मुक्तेश्वर देवालय मार्ग

गोकुळाष्टमी आणि दहीहंडीचा जल्लोष अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरतील, याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्थेचा समतोल राखण्यासाठी प्रशासन सज्ज असून, नागरिकांनी सहकार्य करून सण शांततेत आणि आनंदात साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा