CSK vs KKR
CSK vs KKR 
ताज्या बातम्या

सलग दोन पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्जने विजयाची गुढी उभारली, KKR चा केला दारुण पराभव

Published by : Naresh Shende

आयपीएल २०२४ चा २२ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सोमवारी रंगला. चेपॉक स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात चेन्नईने कोलकाताचा ७ विकेट्सने दारुण पराभव केला. कोलकाताने प्रथम फलंदाजी करून २० षटकांत ९ विकेट्स गमावून फक्त १३७ धावाच केल्या. त्यानंतर या मैदानात उतरलेल्या चेन्नईने १७.४ षटकात १४१ धावा करून कोलकातावर मोठा विजय मिळवला. चेन्नईने सलग दोन सामन्यांच्या पराभवानंतर कोलकाताविरुद्ध विजयी झेंडा फडकवला. तर कोलकाताचा या हंगामात पहिला पराभव झाला.

चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चेपॉकच्या धिम्या खेळपट्टीवर केकेआरच्या केकेआरच्या फलंदाजांची दांडी गुल झाली. सलामीचा फलंदाज फिल सॉल्ट पहिल्याच चेंडूवर बाद झाल्याने त्याला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर सुनील नरेन आणि अंगकृष रघुवंशीने दुसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भागिदारी करुन डाव सावरला. सुनीलने २० चेंडूत २७ आणि रघुवंशीने १८ चेंडूत २४ धावा केल्या. परंतु, या दोघांची विकेट गेल्यावर कोलकाताच्या संपूर्ण संघाची पुरती दमछाक झाली.

रवींद्र जडेजाची भेदक गोलंदाजी

रवींद्र जडेजाने भेदक मारा करून सुनील नरेन आणि व्येंकटेश अय्यरला बाद केलं. कर्णधार श्रेयस अय्यरने ३२ चेंडूत ३४ धावा केल्या. परंतु, रिंकू सिंग, आंद्रे रसल आणि रमनदीप सिंगसारख्या फलंदाजांना धावांचा सूर गवसला नाही. जडेजाने १८ धावा देत ३ विकेट घेतल्या आणि तुषार देशपांडेलाही ३ विकेट मिळाल्या. तर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने ५८ चेंडूत नाबाद ६७ धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला.

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

"देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत"; उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार