सध्या 'छावा' हा चित्रपट खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील सगळेच रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. लवकरच हा चित्रपट 400 कोटी रुपयांचा टप्पा पार करणार आहे . लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटामध्ये विकी कौशल, रश्मिका मंदना, अक्षय खन्ना, डायना पेंटी असे अनेक दिग्गज कलाकार मुख्य भूमिकांमध्ये दिसून आले आहेत. या चित्रपटांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची जीवनकथा दाखवण्यात आली आहे. ही भूमिका विकी कौशलने अत्यंत चोख केली आहे. त्याच्या अभिनयाला चाहत्यांची खूपच पसंती मिळाली आहे.
दरम्यान या चित्रपटामध्ये संभाजी महाराजांचे वडील छत्रपती शिवाजी महाराज दाखवण्यात आले नाहीत. पण त्यांचे अस्तित्व त्यांच्या आवाजामुळे दिसून आले आहे. छत्रपती संभाजी महाराज लहान असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले होते. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचे केवळ संवाद यामध्ये दाखवण्यात आले आहेत. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेला आवाज कोणी दिला? याबद्दल सर्वत्र चर्चा झाली. तर आता राजांचा आवाज नक्की कोणाचा आहे? याबद्दल आपण जाणून घेऊया.
चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराज हे नेहमीच त्यांच्या आईची आठवण काढताना दिसतात. छोटे संभाजी आईची आठवण काढताना नेहमी आबासाहेब म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांशी बोलतानाचे अनेक प्रसंग दाखवण्यात आले. शिवाजी महाराजांचा आवाज नक्की कोणाचा याचा खुलासा डबिंग आर्टिस्ट विजय विक्रम यांनी केला आहे. विजय विक्रम यांनी स्वतः व्हिडिओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे.
विजय विक्रम यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आवाज हा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा असल्याचे सांगितले. त्यांच्या भारदस्त पण प्रेमळ आवाजाने सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली आहेत. तसेच शिवाजी महाराज हे नेहमीच चित्रपटामध्ये असल्याचा भास होत असल्याचेही त्यांनी सांगितले.