विधिमंडळाच्या वेगवेगळ्या समित्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत या समितीत वादग्रस्त राहिलेले धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांना राष्ट्रवादीकडून कोणतही स्थान देण्यात आलेल नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वेगवेगळ्या आमदारांना वेगवेगळ्या समितीत घेण्यात आल आहे मात्र माजी मंत्री असलेले धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांना कुठेच कोणत्याही समिती स्थान दिले गेले नाही.
अजित पवार यांनी जाणीवपूर्वक वादग्रस्त असलेले धनंजय मुंडे यांना समितीत स्थान न देता दोन हात लांब ठेवल्याची जोरदार चर्चा आहे. दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेले मंत्रिपद देखील अजित पवारनी स्वतःकडे ठेवल्याने छगन भुजबळांची नाराजी वाढत असल्याची माहिती मिळत आहे.
अर्थसंकल्पी अधिवेशनामध्ये धनंजय मुंडे यांच्या रिक्त झालेल्या मंत्रिपदावर भुजबळांची वर्णी लागेल अशी जोरदार चर्चा होती मात्र अजित पवारांनी मुंडेच खातं स्वतःकडेच ठेवले आहे. पक्षाचा ओबीसी चेहरा म्हणून प्रसिद्ध असलेल्या भुजबळांना मंत्रिपदापासून लांब ठेवल्याने कार्यकर्त्यांना मधे नाराजी आहे.